फरार 62 वर्षीय विजय मल्ल्या तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत

vijay-mallya-and-pinky-lalwani-2-

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय बँकांना नऊ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशाबाहेर पसार झालेल्या विजय मल्ल्या तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 62 वर्षीय विजय मल्ल्या त्याची गर्लफ्रेण्ड पिंकी लालवानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मल्ल्याचं पहिलं लग्न १९८६ मध्ये समिरा तयाबजी हिच्याशी झालं होतं. ती सुद्धा हवाई सुंदरी होती. १९९३ मध्ये त्यानं रेखा मल्ल्याशी दुसरं लग्न केलं होतं. आता तो ६२व्या वर्षी पिंकीशी तिसरं लग्न करणार आहे.

पिंकी लालवानी ही मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्समध्ये हवाईसुंदरी म्हणून काम करत होती. या दोघांची भेट २०११ मध्ये झाली होती. त्यावेळी मल्ल्यानं तिला किंगफिशर एअरलाइन्समध्ये नोकरीची ऑफर दिली होती. किंगफिशर एअरलाइन्समध्ये नोकरीला लागल्यानंतर पिंकी आणि मल्ल्या यांच्यात जवळीक वाढली. अनेकदा दोघे एकत्र दिसले होते. दोघेही बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. मल्ल्याविरोधात सध्या लंडनमध्ये खटला सुरू असून, पिंकी त्याच्यासोबत कोर्टातही दिसली होती.

बँकांची फसवणूक करुन मल्ल्या परदेशात

उद्योजक विजय मल्ल्याने 17 बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पलायन केलं. गेल्या वर्षी जून महिन्यात मल्ल्याला फरार घोषित करण्यात आलं होतं. त्याला भारतात आणण्याचे जोरदार प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहेत. मल्ल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. तर एप्रिलमध्ये भारताने विजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द केला होता. पिंकी लालवानी त्याच्यासोबत कोर्टातही दिसली होती.