महाराष्ट्र देशा डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. अनेक दिवसांपासून ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. पण तिने गेल्या वर्षी ‘नकाब’ या वेब सीरिजद्वारे पुनरागमन केले होते. आता रजत कपूर दिग्दर्शित ‘आरके/आरके’ या चित्रपटात ती दिसणार आहे. याच पार्श्वभूमीवर एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
मल्लिकाला गंभीर आणि कथेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या भूमिका जास्त प्रमाणात मिळाल्या नाहीत, याच संदर्भात प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली कि, “गंभीर रोलसाठी चित्रपट निर्माते माझ्याकडे आलेच नाहीत कारण माझ्या ग्लॅमरस भूमिकांचा असर माझ्या प्रतिमेवर आणि अभिनय क्षमतेवर पडला आहे. अर्थातच, आता ओटीटीमुळे चांगल्या ऑफर्सद्वारे येत आहेत. मात्र त्या काळात अभिनेत्रींच्या चांगल्या भूमिकाही लिहिल्या जात नव्हत्या. ‘मर्डर’ हा केवळ हॉट चित्रपट होता असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण त्यानंतर अनेक हॉट सिनेमे आले, जे चालले नाहीत. अनेक हॉट अभिनेत्रीही आल्या, ज्यांना त्यांच्या एकाच चित्रपटानंतर पुढे जाता आले नाही. ‘मर्डर’ नंतर सशक्त स्त्री भूमिकांची कमतरता भासू लागली आहे. आता ओटीटीमुळे अभिनेत्रींसाठी सुवर्णकाळ आला आहे. कारण इथे अभिनेत्रींसाठी सर्वप्रकारचे रोल लिहले जातात.”
चांगल्या भूमिका मिळवण्यासाठी तथाकथित गॉडफादर किंवा बॉयफ्रेंड असायला हवा का, याच उत्तर देताना ती म्हणाली कि, बॉलिवूड हे एक मोठे पितृसत्ताक ठिकाण आहे. तथाकथित सामर्थ्यवान पुरुषांद्वारे हे चालवले जाते. काही लोक मला रात्री 12 वाजता फोन करून भेटायला बोलायचे. पण मी हरियाणातील जाट मुलगी आहे. रात्रीची अशी काय चर्चा करायची असते, असे म्हणत मी भेटायला नकार द्यायचे. त्यामुळे मी अशा गोष्टींना बळी पडले नाही.
पुढे तिने एक गंभीर किस्साही सांगितला, “मी दुबईत मल्टीस्टार कास्ट असलेला चित्रपट करत होते. हा एक हिट चित्रपट आहे, लोकांना तो खूप आवडला. मात्र त्या चित्रपटाचा अभिनेता रोज रात्री माझ्या रूमचा दरवाजा ठोठावायचा. कधी कधी तो इतका जोरात ठोठावायचा की असं वाटायचं कि आता दरवाजा तुटेल. पण मी दरवाजा कधीच उघडला नाही. त्यानंतर त्या अभिनेत्याने माझ्यासोबत पुन्हा काम केले नाही”. तसेच यावेळी तिने तिच्या कारकिर्दीत महेश भट्ट यांचे खूप योगदान आहे, असे म्हणत या पुढेही जेव्हा कधी ते चांगली भूमिका ऑफर करतील, तेव्हा त्यांच्याबरोबर काम करायला नक्कीच आवडले, असे देखील सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- Presidential Election Results : द्रौपदी मुर्मूंना विरोधकांचीही मते; 17 खासदारांसोबतच 104 आमदारांचं क्रॉस व्होटिंग
- sanjay raut : “भाजपची मंडळी ‘आयत्या बिळावर नागोबा’ होण्याचा…”, OBC आरक्षणावरून शिवसेनेचा टोला
- County Cricket : भारतीय खेळाडूंचा काउंटी चॅम्पियनशीपमध्ये जलवा, ‘या’ गोलंदाजाने घेतल्या ५ विकेट
- Draupadi Murmu : मोठी बातमी : द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती, देशभरात जल्लोष
- ODI Cricket : वनडे क्रिकेटला हटवण्याबाबत वसीम अक्रमचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाला…!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<