आठ दशकानंतर मल्लखांब ऑलिम्पिकमध्ये परतणार…

मुंबई : २३ जुलै पासून सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी खेळाडू आणि क्रीडारसिक सज्ज झाले आहेत. तब्बल ८५ वर्षानंतर मल्लखांब हा क्रीडाप्रकार सादर करण्यात येणार आहे. याचे सादरीकरण एक प्रात्यक्षिक म्हणून प्रस्तुत करण्यात येणार आहे.

मल्लखांब हा एक प्राचीन भारतीय खेळ म्हणून प्रसिद्ध आहे. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा या खेळाचे प्रात्यक्षिक म्हणून सादरीकरण करण्यात आले होते. त्या वेळी सादरीकरण केलेल्या भारतीय खेळाडूंचा एडॉल्फ हिटलरच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. मात्र तेव्हा या पारंपरिक खेळाला भारतीय संघ म्हणून स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर आता या वर्षी बऱ्याच कालखंडानंतर मल्लखांबला प्रस्तुतीकरणाची संधी मिळणार आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात या क्रीडाप्रकाराचे सादरीकरण होणार होते. मात्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव बघता त्याचे सादरीकरण अनिश्चित असल्याचे बोलले जात आहे. जर उद्धाटन सोहळा सद्द झाला तर, मल्लखांब सादरीकरण समारोप सोहळ्यात केले जाईल. मल्लखांबाच्या सादरीकरणासाठी ३७ मल्लांची निवड झालेली आहे. यात भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि जपानच्या मल्लांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP