मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर आरोपांची मालिकाच सुरु केली होती. समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी नुकतीच मुंबई खंडपीठात सुणवणी झाली आहे. त्यात न्यायालयाने नवाब मलिक यांना फटकारले असून सुणवणी होईपर्यंत ट्विटवर कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही, अशी हमी नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात दिली आहे. यामुळे अखेर वानखेडे कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. मलिक म्हणतात, क़रीब है यारो रोज़-ए-महशर छुपेगा कुश्तों का ख़ून क्यूँकर, जो चुप रहेगी ज़बान-ए-ख़ंजर लहू पुकारेगा आस्तीं का. असे नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे.
क़रीब है यारो रोज़-ए-महशर छुपेगा कुश्तों का ख़ून क्यूँकर ,
जो चुप रहेगी ज़बान-ए-ख़ंजर लहू पुकारेगा आस्तीं का .— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021
आता या प्रकरणी ९ डिसेंबरला उच्च न्यायालयात पुढील सुनावणी आहे. मलिक यांनी याबाबत कुठेही तक्रार का केली नाही?, केवळ ट्विट करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात? का हे सारं निव्वळ प्रसिद्धीपोटी? की मीडिया ट्रायलसाठी? अशा सवालांची सरबत्ती करत न्यायमूर्ती एस. काथावालांकडून मलिकांना फटकारण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल
- मागील सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरारीचे मुख्य कारण- संजय राऊत
- शिवसेनेच्या आमदाराच्या कार्यालयावर नगरपालिकेचा बुलडोझर
- जिन्सीत जागा खरेदी करतांना बाजार समितीने डावलले नियम; माजी सभापती राधाकिसन पठाडेंचा आरोप!
- बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह ‘बिग बॉस’ मधून बाहेर?