कर्नल पुरोहित पाठोपाठ मेजर रमेश उपाध्यायला जामीन

वेब टीम:2008 सालच्या मालेगाव स्फोट प्रकरणी हायकोर्टाने मेजर उपाध्याय यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यानंतर जामीन मिळणारे मेजर रमेश उपाध्याय हे पाचवे आरोपी आहेत.

मालेगावात 29 सप्टेंबर, 2008 रोजी नूरजी मशिदजवळ एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यात सात जणांचा मृत्यू झाला होता, 100 जखमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटाचा प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितची जामीनावर सुटका केली होती. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने मेजर रमेश उपाध्यायची एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. परंतु जामीन मंजूर करताना हायकोर्टाने त्याच्यावर देशाबाहेर जाण्यास बंदी घातली आहे.

या स्फोटात हिंदूत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप असून दहशतवादविरोधी पथकाने याप्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह १२ जणांना अटक केली होती. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने पाच जणांविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगितले होते. तर कर्नल पुरोहितसह अन्य आरोपींवरील मोक्का हटवण्याचेही एनआयएने न्यायालयात सांगितले होते. याप्रकरणात सुमारे चार हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पुरोहित आणि उपाध्याय यांच्यातील दुरध्वनीवरील संभाषण तपास यंत्रणांच्या हाती लागले होते.

 

You might also like
Comments
Loading...