fbpx

मालेगाव बॉम्बस्फोट; साध्वी प्रज्ञासिंह , पुरोहितांना दणका, कोर्टात हजेरी लावण्याचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर आरोपीना विशेष एनआयए न्यायालयाने फटकारले आहे. तसेच बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सुनावणीवेळी उपस्थितीत राहत नसल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा न्यायालयात हजेरी लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या प्रकरणात पुढील सुनावणी २० मी रोजी होणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी,निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर या आरोपींवर बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाईचा कट रचणे, तो अमलात आणणे आदी गंभीर आरोपांतर्गत खटला चालवण्यात येत आहे.

भोपाळ लोकसभेच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सध्या चर्चेत आहेत, शहिद हेमंत करकरे आणि आता महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेबद्दल केलेल्या विधानामुळे साध्वी वादात सापडल्या आहेत.