fbpx

मालदीवमध्ये तैनात भारताचे सैन्य मागे घेण्याच्या सूचना

माली : मालदीव सरकारने भारताने तैनात केलेले दोन हेलिकॉप्टर आणि ५० सैनिक मागे घेण्याची सूचना केली आहे. इमरजन्सीमध्ये रुग्णांना उपचारांसाठी वाहून नेण्याच्या कामासाठी या दोन हेलिकॉप्टरचा वापर केला जाई. मात्र आता मालदीवने त्यांची स्वतःची सेवा सुरू केल्यामुळे भारताला त्यांचे सैनिक आणि हेलिकॉप्टर परत नेण्याची विनंती मालदीव सरकारने केली आहे.

दरम्यान यामागे मालदीवमध्ये वाढत असलेला चीनचा प्रभाव कारणीभूत असल्याची चर्चा आहे. मालदीवचे अध्यक्ष चीनच्या बाजूने झुकले असल्यामुळे चीनला त्यांचे बस्तान मालदिवमध्ये बसवणं शक्य होत आहे. मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यांनी याबद्दल भारत सरकारला माहित माहिती दिली आहे.

भारत मालदीवला सातत्याने लष्करी आणि नागरी मदत करत आला आहे. मात्र भारताला शह देण्यासाठी मालदीवमध्ये चीन आपले वर्चस्व प्रस्थापित करु पाहत आहे.आणि मालदीवच्या अध्यक्षांनी यामध्ये चीनला झुकत माप दिल्याचं दिसून येत आहे.