सोलापूरच्या कार्यध्यक्षाने राष्ट्रवादीची ‘तिकिटे’ विकली, उमेश पाटलांवर गंभीर आरोप

बार्शी: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी राज्यभरात सुरू आहेत. उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यामध्ये आता करमाळा आणि बार्शी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यध्यक्षाने तिकिटे विकल्याचा गंभीर आरोप झेडपीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर यांनी केला आहे. निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांचे नाव न घेता गंभीर आरोप केला आहे.

निंबाळकर यांनी मंगळवारी शिवसेना उमेदवार दिलीप सोपल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल काकडे , शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष देवाजी दिंडोरे, बार्शी नगरपालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, युवराज काटे, ऍड. विकास जाधव, बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गणेश (नाना) जाधव , माजी नगरसेवक वाहिदपाशा शेख , वैराग ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मकरंद निंबाळकर म्हणाले, माजी आमदार व या भागाचे नेते स्वर्गीय चंद्रकांत निंबाळकर यांच्या गटाला मी त्यांचा पुतण्या असताना सुद्धा आमदार दिलीप सोपल यांनीच मला विविध पदे देवून न्याय दिला, दुसरीकडे राऊत गटाने मात्र त्यांच्या मुलाचा व चंद्रकांत निंबाळकर यांच्या नावाचा नुसता वापर करून घेतला आहे. त्यामुळे मी दिलीप सोपल यांचे नेतृत्वाखाली काम केले आहे आणि पुढे ही करणार.

महत्वाच्या बातम्या