टीकटॉकवर व्हिडियो करणं पडलं महागात ; तरुण अटकेत

टीम महाराष्ट्र देशा : पिंपरीतील एका तरुणाला टिकटॉकवर व्हिडीओ करणं  महागात पडलं आहे. हातात कोयता घेऊन व्हिडीओ काढल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. दीपक आखले असे या तरुणाचे नाव आहे.

पिंपरी परिसरातील दीपक आखले या तरुणाने हातात कोयता घेऊन टिकटॉकवर व्हिडीओ तयार केला आहे. घरातून रस्त्यावर येत १० सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे या व्हिडीओमध्ये त्याच्या हातात एक कोयत आहे. व्हीडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर त्याने तो व्हिडीओ परिसरात व्हायरल केला. त्याचा तो व्हिडीओ वाकड पोलीसांपर्यंत पोहंचला. दरम्यान वाकड पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

विशेष म्हणजे, दीपक आखले या तरुणावर मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. याचदरम्यान त्याचा हा व्हिडियो. हातात कोयता घेऊन आपल्या कडे शस्त्र असल्याचे त्याला परिसरात दाखवायचे आणि परिसरात दहशत निर्माण करायची हा त्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.