‘मेकिंग दि तालिबान ग्रेट अगेन’; अमेरिकेत बायडेन यांचे होर्डिंग्स

‘मेकिंग दि तालिबान ग्रेट अगेन’; अमेरिकेत बायडेन यांचे होर्डिंग्स

joe biden

अमेरिका : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अनेक देशांनी या परिस्थितीसाठी मेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दोषी ठरवले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेमध्येही बायडेन यांना दोषी ठरवत त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत.

बायडेन यांनी अमेरिकन सैन्याला अफगाणिस्तानमधून माघारी बोलविण्याचा घेण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांमध्येच तो अंमलातही आणला. बायडेन यांनी याची घोषणा केल्यानंतर तालिबानची ताकद वाढली आणि त्यांनी देश ताब्यात घेतला. यावरुनच बायडेन यांच्यावर टीकास्त्रांचे प्रहार होतांना दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये बायडेन यांचा विरोध करीत मोठ्या आकाराचे होर्डिंग लावण्यात आलेत. या होर्डिंगवर बायडेन यांना तालिबानी दहशतवाद्याच्या रुपात दाखवण्यात आले असून त्यावर ‘मेकिंग द तालिबान ग्रेट अगेन’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

दरम्यान, माजी सीनेटर स्कॉट वैगनर यांनी राष्ट्राध्यक्षांविरोधात हे कॅम्पेन सुरु असून बायडेन यांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण जगासमोर अमेरिकेला शर्मेने मान खाली घालावी लागल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. तसेच पुढील दोन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बायडेन यांचे असे होर्डिंग लावले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या