छोटी राज्य निर्माण करणे सध्या आमचा अजेंडा नाही – अमित शहा

वेगळा विदर्भ फक्त आश्वासनच का ?

टीम महाराष्ट्र देशा – छोटी राज्य निर्माण करण्याच्या विषय सध्या आमच्या अजेंड्यावर नसल्याचं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीवरील परिसंवाद ते बोलत होते. शहा यांच्या विधानामुळे महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ करण्याचे आश्वासन हवेतच विरणार असल्याचं चिन्ह दिसत आहे.

परिसंवादामध्ये उत्तर प्रदेशामध्ये विभाजन करत बुंदेलखंड निर्मितीवर भाजपची काय भूमिका आहे असा प्रश्न प्रेक्षकाकडून करण्यात आला होता. यावर उत्तर देताना शहा यांनी ‘वेगळी छोटी राज्ये निर्माण करण्याचा विषय सध्यातरी आमच्या अजेंड्यावर नसल्याचे’ शहा यांनी स्पष्ट केले.

वेगळा विदर्भ निर्मितीसाठी भाजप सुरुवातीपासून आग्रही आहे. 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपकडून वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही निवडणुकांत भाजपला दणदणीत यश मिळाले होते. दरम्यान, अमित शहा यांच्या या विधानामुळे वेगळ्या विदर्भाचे केवळ आश्वासनच राहणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची हत्या, जनतेचा रोष पाहून राम शिंदेनी काढला पळ

You might also like
Comments
Loading...