पैसे कमावणे हाच शिवसेनेचा एकमेव धंदा आहे,राणेंनी पुन्हा एकदा केले शिवसेनेला लक्ष्य

narayan rane

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असा आरोप राणे यांनी केला. नाणार प्रकल्पवरील शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

पडझड होत असल्याने विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी करण्यासाठी खा. राणे आले असताना माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आपल्या नेहमीच्या अंदाजात त्यांनी शिवसेनेवर चांगलीच आगपाखड केली.

नारायण राणे म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे.’

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला

‘नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही’

‘सरकारच्या ऑनलाईन शिक्षणात गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विचारच नाही’