हिंदू राष्ट्र करणे म्हणजे कावळ्याला राष्ट्रीय पक्षी घोषीत करण्यासारखे- प्रकाश राज

prakash-raj

म्हैसुर: भारताला हिंदू राष्ट्र करणे म्हणजे कावळ्याला राष्ट्रीय पक्षी घोषीत करण्यासारखे आहे. देशात हिंदूंची संख्या जास्त आहे या आधारावर तुम्ही भारताला हिंदू राष्ट्र बनवायला निघाला असाल तर देशात मोरांपेक्षाही कावळे जास्त आहेत. तर कावळ्यालाही राष्ट्रीय पक्षी घोषीत करा. असे म्हणत अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना प्रकाश राज म्हणाले होते, मी हिंदू विरोधी आहे अस ते म्हणतात. पण असे नाही. खरंतर मी मोदी, हेगडे आणि अमित शहा विरोधी आहे. कारण ते हिंदू नाहीत, असे ते म्हणाले होते.

तसेच कर्नाटकात भाजपची सत्ता आली तर मला असुरक्षित वाटेल कारण गुलबर्गमध्ये माझ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ले केले होते. माझ्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. असे राज यांनी स्पष्ट केले.