आयडेंटिटी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेली भेटकार्ड स्पर्धा उत्सहात संपन्न

पुणे – आयडेंटिटी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ख्रिसमस तसेच नववर्षा निमित्ताने भेटकार्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी कमला नेहरू उद्यानात झालेल्या या स्पर्धेत कल्याणी नगर येथील रेणुका वस्ती, नगर रस्ता येथील देवकर वस्ती, सिंहगड रस्त्यावरील चुनभट्टी तसेच राजस्थानी वस्ती मधील इयत्ता 3 री ते 7 वी मधील सुमारे 70 मुले सहभागी झाली होती. या स्पर्धेत लक्ष्मी गावतुरे हिने पहिला क्रमांक पटकावला . तर पवन सावंत याने दुसरा, आलम शेख याने तिसरा, गौतम सावंत याला चौथा तर चनम्मा पुजारी हिने सहावा क्रमांक मिळविला तर अजिंक्य कांबळे याला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.

टीइटो कंपनीचे अधिकारी निलेश सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांनी पर्यावरण जनजागृती करत प्लास्टिकचा राक्षस हे नाटक सादर केले.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून स्मिता दात्ये आणि सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले. संस्थेच्या विश्वस्त संगीता शिंदे यांच्यासह संस्थेच्या शिक्षिका योगिता पगारे, नीता भांडवलकर, जिजा बनसोडे, शीतल भोसले, सविता गोंधळे, संगीता जोशी, मेधा कोल्हे यांनी केले.