fbpx

पद मिळवण्यापेक्षा पक्षात नेता म्हणून स्थान निर्माण करा : जे. पी. नड्डा

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी शनिवारी मुंबईत भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पद मिळवण्यापेक्षा पक्षात नेता म्हणून स्थान निर्माण करा असा सल्ला दिला.

जे. पी. नड्डा यांनी यावेळी मार्गदर्शन करताना ‘आपल्याला पक्षामार्फत सत्ता कारणामध्ये कुठली पदे मिळतील याचा विचार करण्यापेक्षा पक्षात नेता म्हणून आपले स्थान कसे वाढेल याचा विचार करा. सत्तेचे पद आज आहे उद्या नाही. पण, नेतेपण आयुष्यभर टिकते. ते कसे टिकवायचे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही पक्षासाठी जे करताय त्याबाबत समाधानी आहात का याचे खरेखुरे प्रमाणपत्र स्वत:च स्वत:ला द्या, दुसऱ्याच्या प्रमाणपत्राची वाट बघू नका अस विधान केले.

दरम्यान या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सरोज पांडे, रावसाहेब दानवे हे बडे नेते उपस्थित होते.