महिला बालकल्याण निधीचा पुरेपुर वापर करा – डॉ. नीलम गो-हे

पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंदाजपत्रीय तरतुदीं पैकी 80 रक्कम खर्ची झाली आहे. तर, 20 टक्के रक्कम शिल्लक आहे. हे योग्य नाही. उपलब्ध 100 टक्के तरतूद पालिकेने खर्ची करावी, अशी आग्रही मागणी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी केली. तसेच पिंपरी पालिकेतील सत्ताधारी बहुमताच्या जोरावर मनमानी पद्धतीने विरोधकांचे निर्णय घेतात, हे अंत्यत चुकीचे आहे. स्मार्ट सिटीच्या संचालकपदाबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शहरातील विविध प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात शहरप्रमुख व पालिकेतील गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक मारुती भापकर आदी सहभागी झाले होते. त्यानंतर गो-हे यांनी माध्यमांशी संवाद साधला.पालिकेचा कारभार लोकशाही पद्धतीने झाला पाहिजे. सिंगापूरमध्ये विरोधक कोण असावा हे सत्ताधारीच ठरवतात. पिंपरीतही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. विरोधी पक्षांचे निर्णय सत्ताधारी मनमानी पद्धतीने घेत आहेत. विरोधकांचे अधिकार अबाधित ठेवले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त गो-हे यांनी व्यक्त केली आहे.

 

You might also like
Comments
Loading...