‘सर्वांना लस उपलब्ध व्हावी’ ; सोनाली कुलकर्णीची विनंती

सोनाली कुलकर्णी

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. नटरंग चित्रपटातून आणि त्या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्याने सोनाली प्रचंड हिट झाली होती. ‘अप्सरा आली’ या गाण्यातून सोनालीने चाहत्यांना मोहिनी घातली. त्याचं बरोबर उत्तम अशा डान्स आणि सौंदर्यानं सोनालीने चाहत्यांना खिळवून ठेवलं.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला बराच प्रतिसाद देतात. मात्र, यावेळी सोनालीने फोटो शेअर केला नसून सर्वांना लस उपलब्ध व्हावी अशी विनंती सोशल मीडियाच्या माध्यमातून  केली आहे.

सोनाली कुलकर्णीने  इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या आई वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. तसचं तीने कॅप्शन देखील दिलं आहे, “माझ्या आई बाबांचं लसीकरण झालंय..लॉकडाउन होईल किंवा होणारही नाही,ते आपल्या हातात नाही. पण आपली सुरक्षितता ही केवळ आपली जबाबदारी आहे. काळजी घेऊयात, आपली आणि आपल्या कुटुंबाची ” असे आवाहनही सोनालीने चाहत्यांना केले आहे. तर सोनालीने आता सर्वांना लस उपलब्ध व्हावी यासाठी विनंती केली आहे. “P.S. आता लसीकरण सरसकट सगळ्यांसाठी सुरू व्हायला हवं हीच विनंती. ” असं देखील ती पुढे म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या :