औरंगाबाद:अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची डिजिटल सदस्य नोंदणी मोहीम काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असून या सदस्य मोहीमेद्वारे प्रदेश, जिल्हा आणि तालुका कमिटीच्या निवडणुका घेण्यात येणार असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे सदस्य नोंदणी अभियान मोठी चळवळ म्हणून उभी करावी. जेणेकरून काँग्रेस पक्ष भरभक्कमपणे उभा राहील असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी रामकिशन ओझा यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या व्हर्चुल बैठकीत मंगळवार रोजी केले.
काँग्रेस पक्षाची डिजीटल सदस्य नोंदणी मोहीम राबविण्या संदर्भात आयोजीत करण्यात आलेल्या व्हर्चुल बैठकीच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे उपस्थित होते. या बैठकीत बोलतांना श्री ओझा म्हणाले की, काँग्रेस पक्षाने हे सदस्य नोंदणी अभियान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली सक्रीयपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याला डिजिटल सदस्य नोंदणीसाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
सदस्य नोंदणी प्रत्येक बुथवर करण्यात येणार असून एका बुथवर तीन कार्यकर्ते आणि एक महिला कार्यकर्ता निवडल्या जाणार असून तालुकाध्यक्षाच्या देखरेखीखाली ही नोंदणी होईल. आणि त्यानंतर एका जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बुथ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर आणि मेळावा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी तसेच तालुकाध्यक्षांनी बुथ कमिटीवरील कार्यकर्त्यांची यादी दोन दिवसामध्ये महाराष्ट्र प्रदेशकडे पाठवावी असे आवाहन ओझा यांनी केले.
पक्ष विरोधी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरूध्द कडक कारवाई
या बैठकीत जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीचा आढावा घेतांना ओझा म्हणाले की, बदनापुर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी आणि तीर्थपुरी येथे होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा देऊन काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पुर्ण ताकदीने प्रचार करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करावे असे आवाहन ओझा यांनी यावेळी केले. बदनापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत काही पदाधिकारी पक्षाविरोधी भुमिका घेत असल्याच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्यामुळे अशा पदाधिकाऱ्याविरूध्द ताबडतोब निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.
महत्त्वाच्या बातम्या
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र
- “कोरोना सहा महिन्यासाठी कुठे जातो आणि परत कुठून येतो”; करुणा मुंडेंचा ठाकरे सरकारला सवाल
- मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे- चंद्रकांत पाटील
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र
- सुजेन खानसोबतच्या रिलेशनशीपवर काय म्हणाला अर्सलन गोनी, जाणून घ्या…