‘सोयाबीनचे बियाणे तत्काळ उपलब्ध करून द्या’, आ.मुंदडा यांचे कृषीमंत्र्यांना पत्र

बीड : खरीप हंगामासाठी मुख्य पीक म्हणून सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, बियाणांची कमतरता निर्माण झाली आहे. ही कमतरता दूर करून मुबलक प्रमाणात सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केज-अंबाजोगाईच्या भाजप आमदार नमिता  मुंदडा यांनी पत्राद्वारे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात महाबीज सोयाबीन बियाणे १५८, ७१, ३३५, २२८ प्रजातीचे बियाणे बाजारात उपलब्ध नाहीत. महाबीजच्या बियाणासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दरवर्षी पेक्षा यावर्षी व्यापाऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापेक्षा खूप कमी बियाणांचा पुरवठा महाबीजने केला आहे. तसेच बिजोत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही त्यांना पूर्ण क्षमतेने महाबीजकडून बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.

जिल्ह्यात महाबीज सोयाबीन बियाणे शेतकऱ्याना पेरणी पूर्वी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. बिजोत्पादक शेतकऱ्यांनाही नोंदणी प्रमाणे बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.

खा.प्रीतम मुंडे यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

भारतातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला. यामुळे महाराष्ट्राच्या सात हजार कोटींच्या निधीची बचत झाली आहे. तो निधी आता गरीब नागरिक तसेच लॉकडाऊन काळात रोजगाराला मुकलेल्या सर्वांना वितरीत करण्यात येऊन तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP