ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा ६० वर्ष करा – अजित पवार

senior citizen

नागपूर – राज्यातील ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा ६५ वरुन ६० वर्ष करावी आणि तसा निर्णय लवकरात लवकर करावा अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली. दरम्यान सरकारने मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक बोलवावी आणि जोपर्यंत सदस्य समाधानी होत नाही तोपर्यंत लक्षवेधी राखून ठेवावी अशी मागणी केल्यानंतर तालिका अध्यक्षांनी ही लक्षवेधी राखून ठेवत असल्याचे जाहीर केले.

दुसऱ्या आठवडयाच्या दुसऱ्यादिवशी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांची ही पहिलीच लक्षवेधी होती.

राज्यात १ कोटी २५ लाख इतकी ज्येष्ठ नागरीकांची संख्या आहे. सरकारने जो ज्येष्ठ नागरीकांसाठी जीआर काढला तो जीआर अत्यंत बोगस आहे. यातल्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी केली गेली नाही. त्यामुळे या जीआरचा ज्येष्ठ नागरीकांना काहीही उपयोग झाला नाही असा आरोपही अजितदादांनी केला.

सरकार येत्या काळात ज्येष्ठ नागरीकांसाठी उपाययोजना आखणार आहे का? या संदर्भात सरकारने मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक बोलवावी. जोपर्यंत सदस्य समाधानी होत नाही तोपर्यंत लक्षवेधी राखून ठेवावी अशी मागणी दादांनी करताच तालिका अध्यक्षांनी ही लक्षवेधी राखून ठेवत असल्याचे जाहीर केले.