Share

Ajit Pawar | मुंबईला केंद्र शासित प्रदेश करा, कर्नाटक मंत्र्यांच्या मागणीवर अजित पवार संतापले

Ajit Pawar | नागपूर : कर्नाटक सरकारचे कायदे मंत्री माधू स्वामी यांनी मुंबईला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करावा अशी मागणी त्यांच्या विधान परिषदेत केली. मुंबईमध्ये 20 टक्के लोक कन्नड भाषिक राहतात, असा जावई शोध त्यांनी लावला. तर कर्नाटकचे विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सौदी यांनी तर मुंबई ही कर्नाटकची आहे, असा दावा करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. सीमाप्रश्नाला अशा प्रकारे चुकीचे वळण देण्याचे व सीमावासियांच्या भावनेला ठेच पोहोचवण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होतोय, ही माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फोर्मेशन द्वारे सभागृहात मांडली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या कर्नाटक सरकारच्या दोन्ही वक्तव्याचा तीव्र निषेध करावा. तसेच ही माहिती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात यावी. असे प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार याबद्दल त्यांना ताकीद द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात करत कर्नाटकचे कायदे मंत्री व त्यांच्या आमदारांचा तीव्र निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्र विधानसभेत सीमाप्रश्नावर कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव मांडला. हा ठराव मांडल्यानंतर सीमाभागातील नागरीकांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली. आवश्यक सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन कर्नाटकातील बेळगावी, कारवार, निपाणी या शहरांसह महाराष्ट्रातील ८६५ गावांच्या प्रत्येक इंच जमिनीचा समावेश करण्यासाठी सरकार पावले उचलेल, असे ठरावात म्हटले आहे. या ठरावानंतर कर्नाटकमधील मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केले, ज्यावर अजित पवारांनी सवाल केला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | नागपूर : कर्नाटक सरकारचे कायदे मंत्री माधू स्वामी यांनी मुंबईला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करावा अशी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nagpur Politics

Join WhatsApp

Join Now