‘मला मंत्री करा’, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्यानी केली मागणी

NCP

औरंगाबाद : तीन वेळा निवडून येत आमदार सतीश चव्हाण यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. आता त्यांना किंवा मला मंत्री करा अशी स्पष्ट मागणी शिक्षक मतदार संघातील आमदार विक्रम काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. आमदार सतीश चव्हाण गौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पदवीधर मतदार संघ असो किंवा शिक्षक मतदार संघ या दोन्ही मतदारसंघात मतदारांची मने जिंकने इतके सोपे नाही. असे असतानादेखील मी असो किंवा सतीश चव्हाण आम्ही मतदारांपर्यंत जात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली आहे. सतीश चव्हाण यांनी तर विजयाची हॅट्रीक करत विक्रमी मताधिक्‍याने विधान परिषदेत प्रवेश केला आहे. आमच्या मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रीपद दिल्यास समस्या सोडवायला मदत होईल अशी स्पष्ट मागणी विक्रम काळे यांनी केली.

मी मागे हटण्यास तयार
सतीश चव्हाण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांना तरी मंत्री करा असे म्हणत तसे केल्यास मी मागे हटण्यास तयार असल्याचं आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं. पदवीधर मतदार संघातून विजय मिळवूनच नितीन गडकरी यांनी मंत्रिपद मिळाले होतं. इतर पक्षात पदवीधर किंवा शिक्षक आमदारांना मंत्रिपद मिळत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का नाही नाही ?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या