fbpx

ममता बॅनर्जींना काँग्रेस अध्यक्ष बनवा : सुब्रह्मण्यम स्वामी

mamata banarji

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे. अशातच सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जींना काँग्रेस अध्यक्ष बनवा अशी मागणी केली आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्वीट करत तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनिकरण करायला हवे तसेच ममता बॅनर्जींना काँग्रेस अध्यक्ष बनवायला हवे अस स्वामी यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी गोवा आणि काश्मीरचे घटनाक्रम पाहता असेच जर होत राहीले तर लोकशाहीला धोका असून ती कमजोर होईल असे ते म्हणाले. इटालियन्स आणि वंशजांना पार्टी सोडायला सांगा. तरच ममता बॅनर्जी अध्यक्ष होऊ शकतील असंही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कॉंग्रेस सध्या अध्यक्षाविना आहे. त्यांना एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे सुब्रह्मण्यम स्वामींच्या या सल्ल्याचा काँग्रेस कितपत विचार करणार हा येणारा काळ ठरवणार आहे.