ज्योतिरादित्य शिंदेंना कॉंग्रेस अध्यक्ष करा; कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. अशातच मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसचं अध्यक्षपद द्या अशा आशयाचे बॅनर मध्य प्रदेशात लागलेलेआहेत.

Loading...

भोपाळमधील प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर हा बॅनर लावण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद देण्यात यावं, असं आवाहन राहुल गांधींकडे करण्यात आलं आहे. या बॅनरवर मध्य प्रदेश कॉंग्रेसचा उल्लेख आहे. सध्या कॉंग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे. कॉंग्रेसने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांना कॉंग्रेसचा प्रभारी अध्यक्ष बनवलेले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु कॉंग्रेसला या ठिकाणीही चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे शिंदे यांनी कालच राजीनामा दिला होता.Loading…


Loading…

Loading...