‘मेक इन इंडिया’ हा तर रोजगार घोटाळा,संजय राऊत यांचा हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा- बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या असून पंतप्रधान, अर्थमंत्री आणि अन्य नेत्यांच्या दाव्यांप्रमाणे भारत जर सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल तर भारत हे तरुणांसाठी रोजगार निर्माण करणारे आकर्षक ठिकाणी असायला पाहिजे. मात्र, रोजगार निर्मितीत या सगळ्यांचे प्रतिबिंब कुठेच दिसत नसून रोजगार निर्मितीबाबत जे मोठमोठे आकडे दिले जात आहेत त्यात काही तरी घोटाळा आहे, अशी शेलक्या शब्दात टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.सामनामधील ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी ?
बेरोजगारी देशापुढील सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येचा स्फोट झाल्यास देशात अराजक माजेल. गरिबीचे मूळ बेरोजगारीत असून देशात दोन्ही भस्मासूर वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्यानुसार देशात एक कोटी निर्माण झाल्या. मात्र, नोटाबंदीमुळे ४० लाख नोकऱ्यांची आहुती पडली. शेतीचे पानिपत झाले असून अस्मानी व सुल्तानी अशा दोन्ही संकटांनी शेतकरी भुकेकंगाल झाला आहे.देशातील जॉब मार्केटमध्ये काही गडबड असून खासगीकरणाच्या लाटेतही सार्वजनिक उपक्रमात नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. मात्र, भाजपा सरकारच्या राजवटीत तेथेही गडबड झाली. ‘राफेल’ गैरव्यवहाराचा फटका हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) बसला. तेथील शेकडो कामगार बेरोजगाराच्या खाईत ढकलले गेले.

56 इंचाच्या छातीपेक्षा, छातीवर मेडल्स असणारी माणसे जास्त महत्वाची – उद्धव ठाकरे