fbpx

मराठा आरक्षण; भाडेतत्वावर वसतिगृह सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

Chandrakant Patil

टीम महाराष्ट्र देशा :मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं बांधण्याचे काम सुरूआहे मात्र तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्वावर वसतिगृह सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.मराठा आरक्षण संदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीची दुसरी बैठक चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी पाटील यांनी हे निर्देश दिले आहेत .

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करण्यात येणार असून त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. या वसतिगृहांमध्ये पहिल्या टप्प्यात १०० मुले व ५० मुलींसाठीची सोय असावी. आवश्यकतेनुसार ही संख्या नंतर वाढविण्यात येणार आहे. वसतिगृहं बांधण्याचे काम सुरूआहे मात्र तोपर्यंत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याकरिता तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्वावर वसतिगृह सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत ज्याचा फायदा मराठा समाजातील मुलांना होणार आहे.

या बैठकीला समितीचे सदस्य शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे आदी उपस्थित होते.