Sanjay Raut । मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं आहे. शिंदे यांना शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे खरी शिवसेना हि आमचीच असा प्रबळ दावा एकनाथ शिंदे गट करत आहे. शिवाय त्यांनी पक्षाची नवी कार्यकारणी घेऊन पद वाटप करत आहेत. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना चांगलाच खडसावलं आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले कि, लीलाधर डाके, मनोहर जोशी अनेक कठीण प्रसंगात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले आहेत. डाके आणि जोशी यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अशा कडवट निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोणाला भेटत असतील तर स्वागतच केले जाईल. मात्र एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्ती करत आहेत, त्यांना काय अधिकार आहे. पोरखेळ चालू आहे फक्त आम्ही याला गांभीर्याने पाहत नाही, असं ते म्हणाले.
तसेच पुढे राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी वाढवला वृक्ष ज्या सावली मध्ये आपण मोठे झालो, फळ खाल्लीत. तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व दाखवा.प्रत्येकाचं एक स्वप्न असतं मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं. पण आम्हाला महाराष्ट्र सत्ता आणायची आहे. मात्र मिळेल त्या मार्गाने नाही. राज्यात सत्तांतर होईल या माझ्या मताशी मी ठाम आहे. ठीक आहे कोणाला हे स्वप्न वाटत असेल. पण लोकांमध्ये जाऊन लोकशाही मार्गाने आम्हाला सत्ता आणायची आहे, ती वेळ लवकरच येईल, असं म्हणत त्यांनी पुन्हा शिंदेंना डिवचलं आहे.
दरम्यान, याआधी सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. तसेच स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या शेड्युल्ड नुसार अपात्र ठरतील हे नक्की आहे. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसं म्हणवणार असा टोला राऊतांनी लगावला. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या :
- Abdul Sattar | अब्दुल सत्तारांना अर्जुन खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची भलतीच घाई! म्हणाले…
- Sanjay Raut । “जनतेत जाऊन सत्ता परिवर्तन करणार”; संजय राऊत पुन्हा आक्रमक
- Abdul Sattar । तीन तारखेच्या आत गॅरींटीने सांगतो मंत्रीमंडळाचा विस्तार होईल – अब्दुल सत्तार
- Eknath Shinde : माध्यमांना हुलकावणी देत मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर?; रात्री साडेतीन वाजता परतले पुन्हा मुंबईत
- Ajit Pawar : आमच्या सरकारमध्ये पाच नाही, सातजण होते; अजित पवारांनी घेतला फडणवीसांच्या टीकेचा समाचार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<