हात जोडून विनंती करतो शांततेत आंदोलन करा – बापट

Girish_bapat

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची मनापासून इच्छा आहे, मराठा आरक्षण आंदोलनाला 100 टक्के यश मिळेल. मात्र, हात जोडून विनंती करतो की शांततेत आंदोलन करा, अशी विनंती पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यामध्ये लोकप्रतिनिधीच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी समाजाच्या मागण्यांचे निवेदन गिरीश बापट यांनी देण्यात आले.

यावेळी बोलताना बापट म्हणाले की, आज भाजपच्या आमदारांची बैठक आहे. मात्र, आपण मला भेटायला येणार हा निरोप मिळाल्यावर मी तुमची भेट घेण्यासाठी पुण्यात थांबलो आहे. जे तरुण हिंसक आंदोलनात सहभागी नसतील त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी त्यांची याफी आपण पोलीस आयुक्तांना देऊ, अशी ग्वाही यावेळी बापट यांनी दिली आहे.

त्या पोस्टबद्दल रितेश देशमुखचा माफीनामा

मराठा समाजातील मुलांसाठी 10 वस्‍तीगृहे सुरू करणार- चंद्रकांत पाटील