मी कशाला चोंबडेपणा करु? मकरंद अनासपुरे नाना – राज वादापासून चार हात लांब

दोघांच्या शाब्दिक युद्धापासून दूर राहण्याचा प्रयत्न नेते व अभिनेत करीत आहे.

टीम महाराष्ट्र देशा – फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून नाना पाटेकर व मनसे आमने सामने आले आहेत. नानांनी मनसेला फटकारल्या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांना जोरदार प्रतिउत्तर दिले. दोघांचे जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. पण या दोघांच्या शाब्दिक युद्धापासून दूर राहण्याचा प्रयत्न नेते व अभिनेत करीत आहे.

दरम्यान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळी गावांसाठी तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी काम करतात. मात्र मकरंद अनासपुरेंनी नानांच्या या वादात न पडणंच पसंत केले.

नानांचे सहकारी मकरंद अनासपुरे यांनी गप्प राहणंच पसंत केलं. छे…छे… प्रतिक्रिया देऊन , असा सवाल त्यांनी विचारला.

डॉ. तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाच्या म्युझिक लाँचला मकरंद अनासपुरे आले होते. यावेळी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.