राष्ट्रवादीत मोठे फेरबदल, चार जिल्ह्यांचे जिल्ह्याध्यक्ष बदलले

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पुणे शहरासह कोल्हापूर शहर, जळगाव ग्रामीण, यवतमाळ या चार जिल्ह्यांचे जिल्ह्याध्यक्ष बदलले आहेत. तर १० जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष कायम ठेवले आहेत. पक्षांतर्गत जिल्हाध्यक्ष – कार्याध्यक्ष पदासाठी २०१८-२०२० पर्यंतच्या निवडणुका पार पडल्या असून यापूर्वीच २७ जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नेमणुका जाहीर झाल्या आहेत.

पुण्याच्या शहराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची देखील सर्वाना उत्सुकता होती . आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या राजकारणाची असणारी जाण, अभ्यासू, संयमी स्वभाव, सर्वसमावेश चेहरा या गोष्टी महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या पथ्यावर पडल्या आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी अखेर तुपे यांच्याच नावाला पसंती दिल्याचं दिसत आहे.

ठाणे शहर, भिवंडी, कोल्हापूर ग्रामीण, सोलापूर शहर आणि जळगाव ग्रामीण या जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांसोबतच कार्याध्यक्षाचे नवीन पद तयार करुन त्यांच्याही नियुक्त्या केल्या आहेत.

ठाणे शहर – आनंद परांजपे, कार्याध्यक्ष – संजय वढावकर,

ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष – दशरथ तिवरे,

कल्याण – डोंबिवली जिल्हाध्यक्ष – रमेश हनुमंते,

उल्हासनगर जिल्हाध्यक्ष -आ. ज्योती कलानी,

भिवंडी शहरजिल्हाध्यक्ष – खलिद गुड्डू, कार्याध्यक्ष – अनिल फडतरे,

पुणे शहर जिल्हाध्यक्ष – चेतन तुपे,

सांगली शहर – संजय बजाज.

ग्रामपंचायतींमार्फत ४०० ऑनलाईन सेवा दिल्या जाणार