दहशद वादी हल्ल्यात मेजर के. पी. राणेंंसह तीन जवान शहीद

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू-काश्मीरच्या सीमे वरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी दोन दहशद वाद्यांंचा खात्मा केला या, चकमकीवेळी भारताच्या चार जवानांना वीरमरण आले आहे. शहिदांमध्ये एक मेजर आणि तीन जवानांचा समावेश आहे. या कारवाईनंतर नियंत्रण रेषेजवळील परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री उशिरा काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. याबाबतची माहिती मिळताच जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेदरम्यान, जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनीही मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता. यावेळी जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. मात्र, चार दहशतवादी फरार झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जवानांनी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर फायरिंग केली. फायरिंग करत ते भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. लष्कर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दहशतवादी घुसखोरी करत असतांना पाकिस्तानचे जवान त्यांना कव्हर फायरिंग देत घुसखोरी करण्य़ास मदत करत होते. हे दहशतवादी रात्री 1 वाजता घुसखोरीचा प्रयत्न करत होते. पाकिस्तानी जवानाकडून फायरिंग सुरु झाल्यानंतर भारतीय जवान अलर्ट झाले.

श्रीनगर: हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांचा धुमाकूळ

जसप्रीत बुमरा दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

You might also like
Comments
Loading...