पिंपरीत भंगार दुकानांना भीषण आग

pimpari-chinchwad

वेब टीम :पिंपरीत आज एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याने, मोठं नुकसान झालं आहे.दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील कुदळवाडीत भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नसलं, तरी मोठं नुकसान झालं आहे. या आगीने परिसरातील 8 ते 10 दुकानं जळून खाक झाली आहेत.

या गोदामातील प्लॅस्टिक आणि रबरी वस्तूंच्या साठ्यामुळे आग पसरली. तब्बल अडीच तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीत गोदामाला लागलेल्या आगीची झळ परिसरातील चार गोदामे आणि इतर दहा दुकानांना बसली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या सात गाड्या आणि दोन खासगी टँकरने आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. यापूर्वीही या परिसरात आगीच्या घटना घडल्या आहेत.Loading…
Loading...