आयकर विभागाची मोठी कारवाई; पुणे, मुंबईसह 40 ठिकाणी छापे

आयकर विभागाची मोठी कारवाई; पुणे, मुंबईसह 40 ठिकाणी छापे

पुणे : आयकर विभागाने आज मोठी करावाई केली आहे. राज्यभरात एकूण 40 ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांचा समावेश आहे. पुण्यातील एका मोठ्या उद्योजकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही छापेमारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यातील ज्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे त्या व्यावसायिकाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जवळचा संबंध असल्याचं बोललं जात आहे. यावर आता महापालिका निवडणूक तोंडावर असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचं नाव अशा प्रकरणामध्ये आल्याने याचा पालिका निवणुकीत या पक्षांना फटका बसण्याच्या शक्यता आहेत.

आयकर विभागाकडून पुण्यातील उद्योजकाच्या संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यासोबतच महाराष्ट्रातील मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाकडून मोठ्या प्रमाणात झाडाझडती सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या