नीरा-भीमा बोगद्याच्या कामावर अपघात; सात कामगारांचा मृत्यू

पुणे: नीरा- भीमा नदीजोड प्रकल्पा अंतर्गत सुरु असणाऱ्या बोगद्याच्या कामावर अपघात होवून सात कामगार ठार झाले आहेत. तावशी ते डाळजदरम्यान 150 मीटर खोल बोगदा तयार करण्यात येत असून या ठिकाणी कामगारांना वाहून नेणारा बॉक्स कोसळल्याने हा अपघात घडला

गेली सहा महिनेपासून बोगदा बनवण्याचे काम सुरु आहे. आज सायंकाळी ६ च्या सुमारास बांधकाम साहित्य आणि कामगारांनी भरलेला लिफ्टिंग बॉक्स तब्बल २०० ते २५० फुटावरून कोसळला. दरम्यान या अपघातात सात कामगार ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.