मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; ३ ठार

मुंबई: मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या चारचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. खालापूरच्या फूड मॉलजवळ हा अपघात झाला. मृतांची ओळख अद्यापही पटलेली नाही. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी होती. मात्र, चारचाकी बाजूला काढल्याने वाहतूक सुरळीत झाल्याचे समजते.