‘हे तर फक्त तीन पक्षाचं सरकार, 1978 ला किती पक्षांचं सरकार चालवलं हे आठवत नाही’

मुंबई : ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचा सहभाग आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘हे सरकार 5 वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही. सरकारचं नेतृत्व करणा-या व्यक्तीच्या स्वभावावर हे अवलंबून असतं. त्यांची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे,’ असे म्हणत पवार यांनी हे सरकार 5 वर्षे चालणार असा विश्वास व्यक्त केला.

Loading...

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘हे तर 3 पक्षांचं सरकार आहे, 1978 ला मी किती पक्षांचं सरकार चालवलं हे मला आठवत नाही,’ असे खा. शरद पवार माझा व्हिजन कार्यक्रमात बोलत होते. ‘शेतीवरचा भार कमी करायला हवा, शेतीवरील अवलंबून लोकसंख्या कमी झाली तर शेतीक्षेत्राचा विकास होईल, विकसित देशांचं हेच सूत्र आहे,’ असे पवार म्हणाले.

दरम्यान, ‘देशातील लोकसंख्येचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. ठिबक सिंचनाच्या वापरात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आधुनिक शेती आणि शेतीपुरक उद्योगांवर भर देण्याची गरज असल्याची माहिती यावेळी बोलताना शरद पवार यांनी दिली. याचप्रमाणे शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी काम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश