‘कोरोना’ संसर्गाच्या भीतीने लोकांनीच केली मुख्य रस्त्यावर दगड व बांबू बांधून नाकाबंदी

बारामती : बारामती शहरात रविवारी दिनांक २९ कोरोना संसर्ग रुग्ण आढळला असून तो रुग्ण रिक्षा चालक असल्याने त्याचा अनेक भागात संपर्क आल्याची शहरात चर्चा असल्याने बारामतीकरांनी आपल्या भागात बाहेरील कोणी व्यक्ती येऊ नये म्हणून आपल्या भगत व गल्लीत येणाऱ्या रस्त्यावर दगड व लाकडी कळक आडवे लावून रस्ता बंद केला आहे.

बारामती शहरात रविवारी कोरोना सारख्या भीषण संसर्गाचा रुग्ण शहरात आढल्याने शहरात चांगलीच घबराट पसरली आहे. तसेच हा रुग्ण रिक्षा चालक असल्याने तो भाडे सोडवण्यासाठी व स्वतःच्या इलाजासाठी शहरातील अनेक भागात तसेच हॉस्पिटलमध्ये गेला होता.

तसेच अशी जोरदार चर्चा असल्याने शहरातील अनेक भागातील परिसरात व गल्ली मध्ये प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर तेथील रहिवासीयांनी बाहेरचा कोणीही नागरिक आपल्या परिसरात येऊ नये म्हणून अनेक ठिकाणी रस्ता बंद केला आहे.

सध्या शहरात कलम १४४ कालमांतर्ग संचारबंदी असल्याने व शहरात कोरोनाचा रुग्ण आढल्याने शहरातील अनेक रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. त्यामुळे शहराच्या परिसरातील नागरिक अंतर्गत रस्त्याचा येण्या-जण्यासाठी वापर करत आहेत. सध्याच्या या बिकट परिस्थितीत कोणावरही विश्वास ठेवून चालणार नाही म्हणून आम्ही स्वतः ही नाकेबंदी करत असून फक्त आमच्या भगतीलच लोक येथुन ये-जा करू शकतात असे येथे असणाऱ्या तरुणांनी सांगितले.