प्लॅटफॉर्मची उंची मोजणारे किरीट सोमय्या आता गप्प का: राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे

एल्फिन्स्टन स्टेशनवर काल झालेल्या अपघातावर आपली भूमिका मांडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच येत्या ५ ऑक्टोबरला मुंबईतील रेल्वे प्रश्नांच्या मुद्यावर मोर्चा काढणार असल्याच राज यांनी सांगितल आहे.

राज ठाकरेच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
मुंबईमधील रेल्वे स्टेशन आणि ट्रेनची परिस्थिती सुधारली जाणार नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही वीटरचून देणार नाही. मोदींना पाहिजे तर गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवावी

येत्या ५ ऑक्टोबरला मुंबईतील रेल्वे प्रश्नांच्या मुद्यावर मोर्चा काढणार आणि स्वत:ही त्यात सामील होणार

पंतप्रधान धादांत खोत बोलतात. एवढ होत बोलणारा पंतप्रधान बघितला नाही

एका बाजूला म्हणायचं सरकार आमचं ऐकत नाही, मग सरकारमध्ये बसलात कशाला, खुर्च्यांमध्ये बसून अंडी उबवताय ना त्यांच्याबरोबरीने मग सरकार ऐकत नाही कशाला म्हणतात

सुरूवातीला रेल्वेची उंची मोजणारे किरीट सोमय्या आता गप्प का? साडेतीन वर्षापासून ते गप्प आहेत, सत्ता आल्यावर आधी पाठपुरावा करणारे आता झोपले,

सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं कळलं नाही. प्रामाणिक पणे तो माणूस चांगलं काम करत होता. आयत्या वेळेला यांच्या बुलेटच्या ट्रेनच्या लाडापायी सुरेश प्रभूंना हटवण्यात आलं.

मुंबईतील माणसं मारायला आपलीच माणसं काफी आहेत. त्यासाठी पाकिस्तानातीला दहशतवादी किंवा चीनची काय गरज,