मी ब्राम्हण आहे नावाआधी चौकीदार लावू शकत नाही – सुब्रमण्यम स्वामी

subramanian swamy

टीम महाराष्ट्र देशा : राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार चोर है’च्या नाऱ्याला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘मैं भी चौकीदार’ हे अभियान सुरु केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपचे सगळेच कार्यकर्ते, नेते नावाआधी चौकीदार शब्द लावत आहेत. मात्र, याला भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध केला असून त्यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे.

मी माझ्या नावाच्या आधी चौकीदार शब्द लावलेला नाही. मी ब्राह्मण असून चौकीदाराने काय करायचे आहे, याचा आदेश मी देईन. अशावेळी माझ्या नावाआधी मी चौकीदार लावू शकत नाही, असे स्वामी यांनी म्हंटले आहे. या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राफेल करार घोटाळ्याचा आरोप करत काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ ही मोहीम सुरू केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाने ‘मैं भी चौकीदार’ हे अभियान सुरू केले. त्यानंतर देशभरात भाजपा नेत्यांनी आपल्या नावाआधी ‘चौकीदार’ शब्द जोडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौकीदार नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी चौकीदार अमित शहा असे नावात बदल केले आहेत.