fbpx

देश म्हणतोय “मै भी बेरोजगार”

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर देशातील समस्यांना केंद्रस्थानी ठेवत राजकीय पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मै भी चौकीदार या अभियानाला उत्तर देत आता मै भी बेरोजगार अभियान कॉंग्रेस कडून चालू झाले आहे. सध्या सोशल मिडीयावर मै भी बे रोजगार अभियान जोरात सुरु आहे. अनेकजण आपल्या नावाच्या समोर बेरोजगार लावत आहेत.

बेरोजगारीच्या मुद्यावर विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. रोजगाराच्या मुद्द्यावर मोदि सरकार कशाप्रकारे फेल झाले आहे आणि या बेरोजगारीला मोदि सरकार कशाप्रकारे जबाबदार आहे यावर सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

भारतात बेरोजगारीचा दर 7.1 टक्के आहे. 45 वर्षांमध्ये ते सर्वोच्च आहे. का? नरेंद्र मोदी उत्तर देणार का? असे ट्वीट

एनएसएसओच्या म्हणण्यानुसार, 4 कोटी 70 लाख नोकर्या गमावल्या आहेत. का? नरेंद्र मोदी उत्तर देणार का?