मुंबई:राज्यात सध्या हनुमान चालीसा प्रकरण चांगलेच गाजत आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी समर्थन केले आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे (Mahesh tapase) यांनी प्रतिक्रिया देत राणा दांपत्याला सल्ला दिला आहे.
“आज वीज निर्मितीचे संकट महाराष्ट्रासह देशातील इतर काही राज्यांमध्ये सुद्धा उद्भवत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून जर देशाच्या पंतप्रधानांवर दबाव टाकण्याचे काम या नेत्यांनी केले असते, अतिरिक्त कोळश्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकला असता किंवा कोळश्याच्या नियोजनाबाबत लोक सभेत प्रश्न उपस्थित केला असता तर महाराष्ट्रासह देशाच्या जनतेने त्यांचे कौतुक केले असते.”, असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे.
आज दुर्दैवाने काही नेते अशा महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊन राज्यात धार्मिक, सामाजिक व राजकीय वाद निर्माण करण्याचे आणि महाविकास आघाडी सरकार बदनाम करून राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत.
— Mahesh Bharat Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) April 22, 2022
आज दुर्दैवाने काही नेते अशा महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊन राज्यात धार्मिक, सामाजिक व राजकीय वाद निर्माण करण्याचे आणि महाविकास आघाडी सरकार बदनाम करून राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु महाराष्ट्र कधीही अस्थिर होणार नाही, आणि राज्य सरकारही खंबीरपणे आपले कर्तव्ये पार पाडेल, असा आमचा पूर्ण विश्वास आहे. असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- लोड शेडिंगच्या प्रश्नावर अजित पवार यांचं मोठं विधान
- “महाराष्ट्र कधीही अस्थिर होणार नाही”, राणा दांपत्याच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर महेश तपासेंची प्रतिक्रिया
- अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले! म्हणाले, “तारतम्य…”
- “आयुष्यभर मातोश्री वरचे धुणे-भांडे करून थोडी तरी सुबुद्धी…”, राम सातपुतेंचा संजय राऊतांना टोला
- संजय राऊतांच्या सभेसाठी वीज चोरी, पक्षांतर्गत चौकशीची सारवासारव!