मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नगर विकास विभागाने घेतलेले काही महत्वाचे निर्णय आणि त्यांना तत्कालीन ठाकरे सरकारने दिलेला तब्बल ९ हजार ५०० कोटींचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एक व्हिडीओ शेयर करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “सरकारने जाणून बुजून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी थांबवलेला आहे. मात्र शिवसेनेचा निधी थांबवलेला नाही. आत्तापर्यंत एकनाथ शिंदे जे म्हणत होते की, अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांनी निधी दिला नाही, परंतु आता हे स्पष्ट झालं की अजितदादांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना समान निधी दिला होता.”
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही इतर पक्षांच्या आमदारांसोबत दुजाभाव केला नाही. हा दुजाभाव फक्त महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे, असा आरोप महेश तपासे यांनी यावेळी केला आहे. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनीही टीका केली आहे. तसेच या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- CM Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरेंच्या नावे असणारी ‘ती’ योजना कार्यान्वित करणार; शिंदे सरकारचा निर्णय
- Deepali Sayed : संजय राऊत, शांतता घ्या, ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्या; दिपाली सय्यद यांचा सल्ला
- Uday Samant | आमच्या मनात उद्धव साहेबांसाठी आदर कायम राहणार – उदय सामंत
- SL vs PAK : हसन अलीने सोडला सोपा कॅच, सोशल मीडियावर झाला तुफान ट्रोल; पाहा VIDEO!
- Sanjay Raut : “उनकी मुस्कुराहट पर न जाना…”, संजय राऊतांनी पोस्ट केला ‘तो’ फोटो
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<