मंदीत कंपन्यांना वाचवण्यासाठी महेश लांडगेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

टीम महाराष्ट्र देशा : पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात आॅटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये मंदीचे स्थिती निर्माण झाली आहे. या आर्थिक मंदीमुळे उद्योगधंद्यात अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अनेक उद्योजकांनी कंपन्यांना टाळे लावल्याने बेरोजगारीत प्रचंड वाढ होवून दूरगामी परिणाम भोगावे लागणार आहे. त्यामुळे उद्योजकांना मंदीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना हे साकडे घातले आहे. आमदार लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड, चाकण, रांजणगाव एमआयडीसी या औद्योगिकनगरी आॅटोमोबाईल इंडस्ट्रीज हबमूळे संपूर्ण जगाच्या नकाशावर पोहोचल्या आहेत.

Loading...

पण सध्या आॅटोमोबाईल इंडस्ट्रीयल खूप मंदीची परिस्थिती निर्माण झालेली असून त्यांना मंदीमुळे उद्योगधंद्याना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वाहन उद्योग बंद पडत आहे. पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील बरचसे लघुउद्योग, लघुउद्योगावर आधारित सर्व कामगार, नोकरवर्ग हे पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजणगाव या औद्योगिक नगरीवर अवलंबून आहेत.

आॅटोमोबाईल इंडस्ट्रीजमधील मंदी कोणत्याही परस्थितीत हटवणे गरजेचे आहे. संबंधित एमआयडीसीतील कंपन्या स्थलांतरित होत आहेत. जर त्या येथून स्थलांतरित झाल्या तर त्याचा खूप मोठा दूरगामी परिणाम पिंपरी चिंचवड महापालिका आणि सर्व संबंधित ठिकाणी होणार आहे. यावर उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे.

दरम्यान, याबाबत गांर्भियाने विचार करुन आॅटोमोबाईल इंडस्ट्रीजला मंदीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने मोठी आर्थिक तरतूद करुन संबंधित उद्योगांना करमुक्त करणे अत्यावश्यक आहे. त्याद्वारे ते उद्योग याच ठिकाणी स्थिरस्थावर ठेवूनच उद्योगांना मदत करावी, अशीही मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले