पद असो वा नसो गरजूंना मदत करत राहणार :महेश लांडगे

पुणे – ‘राजकारणात येण्यापूर्वीपासून नागरिकांची सेवा करत आलो. यामुळेच नगरसेवक ते आमदारपदापर्यंत पोहचलो. संघर्ष करणाऱ्याला कुठलेही ध्येय गाठणे अशक्य नसते. गरजूंना मदत करणे हेच मोठे काम असून, यापुढेही पद असो वा नसो ते सुरु राहील असं म्हणत आमदार महेश लांडगे यांनी आपला जीवनप्रवास उलडला.

पुण्यातील पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रिडामंच येथे आयोजित ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’, तर आमदार महेश लांडगे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना संघर्षाशिवाय जीवनाला अर्थ नसतो. संघर्षातून आलेल्या माणसाला परिस्थितीची जाणीव असते, हे नितीन काळजे आणि राहुल जाधव या पिंपरीच्या दोन्ही महापौरांमध्ये पाहिले आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे .

महेश लांडगे यांना पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कारLoading…
Loading...