मुंबई – दक्षिणेच्या सुपरस्टार महेश बाबूबाबत लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळते. आणि त्यात नम्रता शिरोडकरसोबत विवाह केल्याने मराठी सिनेरसिकांमध्येही त्याच्याबाबत कमालीचे आकर्षण दिसून येते. लोक महेश बाबूच्या प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल लाईफपर्यंत सर्वकाही जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अशातच, महेश बाबूच्या फॅन्ससाठी एक जबरदस्त सप्राईज समोर आले आहे. महेश बाबूची लेक सितारा घट्टामनेनी हिनेही आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून, तिने केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ सध्या जबरदरस्त व्हायरल होत आहे.
महेश बाबूची मुलगी सितारा घट्टामनेनी हिने सरकारू वारी पाता मधील गाण्यावरील व्हिडीओमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. निर्मात्यांनी सिताराचा हा व्हिडीओ पेनी सॉन्ग्स या शीर्षकासह प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, सितारा हिच्या पेनी सॉन्ग्सच्या प्रोमोला जबरदरस्त प्रतिक्रिया मिळत आहेत. दरम्यान, याच्या निर्मात्यांनी संपूर्ण गाणे रविवारी रिलीज केले जाईल, असे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<