दंगल व बाहुबलीला मागे टाकत पहिल्याच दिवशी या चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड

दंगल व बाहुबली चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत साऊथचा सुपरस्टार महेश बाबूच्या स्पायडरने जगभरात जबरदस्त कमाई केली आहे. महेश बाबूचा स्पायडर बुधवारी संपूर्ण जगात रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५० कोटी इतकी जबरदस्त कमाई केली.
तमिल, तेलुगु बरोबर, कन्नड आणि अरबी भाषा मध्ये  हा चित्रपट डब करण्यात आला  आहे. स्पायडर हा एक अॅक्शन सिनेमा असून.या चित्रपटाकरीता १२० कोटी खर्च करण्यात आला. अमेरिकेमध्ये देखील या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ करोड रुपये कमाई केली आहे. या अगोदर जय कुश या चित्रपटाने एका आठवड्यात १३२ करोड रुपये कमाई केली होती. आता महेश बाबूचा स्पायडर जय कुशचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले असे वाटते.