महेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है

dhoni

टीम महाराष्ट्र देशा- काल झालेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सामन्यात कांगारूंना पराभवाचा धक्का देत ऐतिहासिक विजय मिळवला. या निर्णायक सामन्यात  पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. मात्र या सामन्यात युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला. चहलने या सामन्यात तब्बल सहा विकेट घेतल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. या खेळीमुळे धोनीला रिटायर होण्याचा सल्ला देणाऱ्या टीकाकारांचे धोनीने थोबाड फोडले आहे.

याआधी भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत 2-1असा विजय मिळवला आहे. तर टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली आहे. यामुळे भारत हा पहिलाच देश ठरला आहे ज्याने एका ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी, वन-डे आणि टी20 मालिकेत पराभव स्विकारलेला नाही.

Loading...

या ऐतिहासिक विजयानंतर धोनीला 8 वर्षांनंतर वन डे मालिकेत मॅन ऑफ दी सीरिजच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने 2011मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅच ऑफ दी सीरिज पुरस्कार जिंकला होता. धोनीचा हा वन डेतील सातवा मॅन ऑफ दी सीरिज पुरस्कार आहे.

 धोनीने या मालिकेत विक्रमांचा पाऊस पाडला.

  • धोनीने तीन सामन्यांच्या मालिकेत सलग तीन अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. 
  • धोनीने या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. तब्बल 193च्या सरासरीने 193 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
  • धडाकेबाज आणि तितक्याच संयमी खेळीमुळे मालिकावीराचा पुरस्कारपटकावला. हा त्याचा सातवा मालिकावीर पुरस्कार ठरला आहे.
  • धोनीने वनडेत सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली, युवराज सिंग, सौरव गांगुली यांच्या 7 मालिकावीर पुरस्कारांची बरोबरी केली आहे. 15 मालिकावीर पुरस्कारांसह सचिन पहिल्या क्रमांकावर आहे.
  • ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत 1000 धावांचा टप्पा पार करणारा धोनी भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. भारताकडून सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी हा पराक्रम केला आहे.
  • धोनीने फलंदाजी बरोबर यष्टीरक्षकाची भुमिका बजावताना 1 झेल आणि 2 यष्टीचीत केले आहे.
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील