महेंद्र सिंह धोनीचं IPL खेळण्याचं शेवटचे वर्ष ?

महेंद्र सिंग

मुंबई : आजपासून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे . मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर आयपीएलची स्पर्धा ही युएईमध्ये भरवण्यात आली होती. युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पर्धेचा प्रमुख संघ म्हणून समजला जाणारा संघ चेन्नई सुपर किंग्सची कामगीरी निराशाजनक राहिली होती. महेंद्र सिंग धोनीच्या नेत्रृत्वातील चेन्नई सुपरकिंग्स टीम 7व्या क्रमांकावर पोहोचली होती. त्यानंतर आता आयपीएल 2021 मध्येही चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी दावेदार मानलं जात नाहीये.

हा आयपीएलचा हंगाम सुरु होताच न्नई सुपर किंग्सचा कॅप्टन धोनी याचं नाव बरंच चर्चेत येत आहे. महेंद्र सिंग धोनीसाठी हा आयपीएल हंगाम शेवटचा असणार का याबाबत चर्चा होत आहेत. याबाबत CSK संघाच्या सीईओ यांना देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी याबाबत खुलासा जरी केला असला तरी कॅप्टन कूल पुढच्या वर्षीपासून IPL खेळणार की नाही याची चर्चा मात्र सगळीकडे रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

मीडियाच्या प्रश्नाला उत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काशी विश्वनाथन म्हणाले, ‘मला वाटत नाही की हे महेंद्र सिंह धोनीचं IPL खेळण्याचं शेवटचे वर्ष आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे आणि आम्ही इतर कोणत्याही खेळाडूबद्दल सध्या नियोजन करत नाही आहोत.”

महत्वाच्या बातम्या