मुंबई : महेंद्रसिंह धोनी आयपीएल २०२२ संपल्यापासून रांचीमध्ये आहे. शहरातील मिंत्रांकडे तो नेहमी जात असतो. अलीकडेच तो त्याचे टेनिस प्रशिक्षक सुरेंद्र कुमार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला होता. सुरेंद्रही रांचीचे आहेत. ते केवळ टेनिस प्रशिक्षकच नाही तर धोनीचे जुने मित्रही आहेत. धोनीने प्रशिक्षक सुरेंद्र कुमार यांना खास शूज भेट म्हणून दिले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बर्थडे पार्टी रांचीच्या क्रिकेट स्टेडियममध्ये झाली.
टेनिस प्रशिक्षक सुरेंद्र कुमार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत धोनी व्यतिरिक्त झारखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव अमिताभ चौधरी यांच्यासह अनेक अधिकारीही उपस्थित होते. सुरेंद्र धोनीसाठी किती खास आहे, याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो. केक कटिंग सेरेमनीनंतर धोनीने त्याला स्वतःच्या हाताने केक खाऊ घातला.
आयपीएल २०२२ संपल्यानंतर धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तो कधी फुटबॉल तर कधी टेनिस खेळताना दिसतो. त्याचबरोबर तो सेंद्रिय शेतीवरही पूर्ण भर देत असून लवकरच तो मोठ्या पडद्यावरही अभिनय करताना दिसणार आहे. या वर्षी त्याच्या नेतृत्वाखालील आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी फारशी चांगली नव्हती. चार वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई यावेळी नवव्या स्थानावर होता. धोनीपूर्वी संघाचे कर्णधारपद रवींद्र जडेजाच्या हाती होते. पण, ही जबाबदारी त्याने हंगामाच्या मध्यावरच सोडली.
महत्त्वाच्या बातम्या –