महादेव जानकरांचे रावसाहेब दानवे यांच्या चरणी लोटांगण

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार आहे. त्याचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस. भाजपच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्यावेळी भाजपमधून उमेदवारी भरणाऱ्या जानकरांनी यावेळी स्वत:च्या पक्षातून म्हणजेच रासपमधून अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतेवेळी महादेव जानकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या चरणी लोटांगण घातल्याचं चित्र पहायला मिळाले.अर्ज दाखल करताना जानकरांनी रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला होता. त्यांचा हट्ट भाजपने अखेर पूर्ण केल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. धनगर आरक्षणावर सरकारकडून काही ठोस पावले उचलली जात नसल्याने जाणकर भाजपवर नाराज आहेत. जर विधानसभा किंवा लोकसभेसाठी भाजपकडून जागा लढवल्यास त्याचा फटका रासपला बसू शकतो असं जानकर यांना वाटत असल्यानेच त्यांनी रसपमधून विधानपरिषदेसाठी अर्ज भरल्याची चर्चा आहे.

अखेर भाजपने महादेव जानकर यांचा हट्ट पुरवत त्यांना विधान परिषदेसाठी रासपमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली आज विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर महादेव जानकर यांनी आपल्याचं पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र अर्ज भरताना महादेव जानकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

युतीच्या उमेदवारांना विजयी कर, पंकजा मुंडे तुळजा भवानी मातेच्या चरणी

 

You might also like
Comments
Loading...